100+ V P Kale Marathi Quotes (व. पु. काळे Classic Marathi Quotes)

लेखक व. पु. काळे यांचे आयुष्याला प्रेरित करणारे विचार  (V P Kale Marathi Quotes). व पु काळे (V.P Kale) म्हणजेच वसंत पुरुषोत्तम काळे. मराठी साहित्यीक विश्वावर अधिराज्य गाजवणारे एक नाव. जरी आज व.पु. काळे हयात नसले तरीही त्यांचे साहित्य वर्षों वर्ष रसिकांच्या मनावर कायम अजरामर राहिल. आम्हांला आशा आहे की, तुम्हांला ते नक्की आवडतील.

V P Kale Marathi Quotes

“माणूस गर्दीचा झाला म्हणजे हरवत नाही. एकटा राह्यला की हरवतो.” ― व. पु. काळे

Click here to read Top 10 Inspirational Marathi Thoughts

अश्रू फक्त स्वतःची वकिली करतात
वाहणाऱ्या डोळ्यांना स्वतःच्या चुका दिसत नाहीत.
V P Kale Marathi Quotes

पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल पण लयलूट करायची ती सुंगधाचीच…

रायगड पाहायचा असेल तर तो पायी चढत चढतच बघायला हवा.
मोटारीचा रस्ता
वरपर्यंत केला
किंवा हेलिकॉप्टर मधून उतरलात की
विज्ञानाचा “चमत्कार” समजतो…
“इतिहास” समजत नाही…!

समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंय जबर संघर्ष असतो
पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचलात की आयुष्याच्या अनेक समस्या ती उंची सोडवते

ज्यांच्या असण्याचा अर्थ असतो
त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते

V P Kale Marathi Quotes

“शृंगार आणि वैराग्य एकत्र नांदत नाहीत, त्याचप्रमाणे संशय आणि भक्ती . वैराग्य केवळ तारुण्यावर आघात करीत असेल, पण संशय उभ्या आयुष्याची राख करतो.”

― व. पु. काळे

Click here for Marriage anniversary wishes for wife in marathi | बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

कोणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने पडू नये
असह्य झाल तर अलिप्त व्हावं
उपदेशक होऊ नये

ज्या दिवशी जबाबदारीच
ओझ खांद्यावर येत ना
त्या दिवसापासून रुसायचा आणि थकायचा अधिकार संपतो

आयुष्य कोणत्याही सिद्धांतावर चालत नाही
आयुष्य म्हणजे आखून दिलेली पायवाट नव्हे किंवा रेल्वेचे रूळ नव्हेत
ते गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सुसाट वाहत वाट आणि उतार गवसेल तस

जेवढ घट्ट नात, तेवढेच मानापमान,
परक्या माणसाला परक्या माणसाला
आपलं प्रेमही देणं लागत नाही आणि क्रोधही…

V P Kale Marathi Quotes

“माणसाजवळ पत हवी, ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी, मग दुनिया तुमचं कौतुक करते.”

― व. पु. काळे

V P Kale Marathi Quotes

नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही,
वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव जोडायचे असतात…

एखाद्या घटनेतला ‘मी’ काढून टाकला तर समस्येवर उपाय हमखास मिळतो. कारण त्या परिस्थितीतल ममत्व नाहीस होत…

ज्याच्याशी लढायचंय त्यांचा पूर्ण परिचय असावा,
हा युद्धाचा पहिला नियम आहे.

परमेश्वराने प्रत्येक माणसाला एक स्वर देऊन पाठवलं आहे.
अंतर्मनातल्या वीणेवर तो स्वर सतत वाजत असतो.
बाहेरच्या गोंगटाकडे थोडं दुर्लक्ष केल म्हणजे तो स्वर ऐकू येतो.
तो स्वर ऐकू आला म्हणजे जीवन महोत्सवासारखंच होत
V P Kale Marathi Quotes

V P Kale Marathi Quotes

“ज्या ज्या ग्रंथांच्या वाचनाने माझी आतली ज्याेत जास्त प्रज्वलित होत आहे आणि प्रकाशाचं आकाश असीम होत आहे असेच ग्रंथ माझे गुरू आहेत.”

― व. पु. काळे

खळाळून टाळी देणाऱ्या हातात एक सौंदर्य असतं. परमेश्वर माणसाला रिक्त हस्ते पाठवतो अस म्हणण्यात काही अर्थ नाही.
अस असत, तर नुकत्याच जन्माला आलेल्या इवल्या इवल्या बाळमुठी वळलेल्या नसतात. त्या वळलेल्या बालमुठीत एक टाळी लपलेली असते.
ही टाळी आयुष्यभर अनेक महाभागांना सापडत नाही…

पुरुषांना पण व्यथा असतात
त्यांना त्यांच्यावर उत्कटतेने
प्रेम करणारी व्यक्ती कायम हवी असते
उडुन जाणार अत्तर त्यांना पटत नाही

ज्या माणसाला विचारांची सोबत आहे,
त्याला कोणतेही अंतर लांब वाटत नाही,
एकदा विचारांची साखळी सुरू झाली की त्या साखळी पेक्षा रस्ता कधीच लांब नसतो
V P Kale Marathi Quotes

V P Kale Marathi Quotes

आयुष्यातला सर्वात मोठा आनंद म्हणजे, जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतंं ते साध्य करून दाखवणं..

व. पु. काळे

V P Kale Marathi Quotes & V P Kale Marathi Thoughts

बंधनांनी जोडत आलं नाही
तर काही माणसं
स्पंदनानी आपल्यासोबत कायमची जोडली जातात

स्वप्न कोणत बाळगाव ह्याचे नियम होऊ शकत नाहीत…
पण कोणाच्याही स्वप्नाला आपल्या सहवासामुळे तडा जाणार नाही,
हा नियम माणसाने सांभाळायला हवा…

एका क्षणात दृष्टीकोन बदलणं हे साधसुध स्थित्यंतर नाही. जगातली सर्वात अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणं. इतर गोष्टी केव्हाही बदलता येतात. आज आवडलेली गोष्ट उद्या फेकून देता येते. पण नवा विचार स्वीकारण ही खूप मोठी घटना आहे. आणि तो क्षण साजरा केलाच पाहिजे

आवडलेल आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा उरते ती फक्त तडजोड
कारण आवडलेल कधी विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारता येत नाही

खरेदी करण्यासाठी क्लिक करा – Vapurza, Marathi By V P Kale

खरेदी करण्यासाठी क्लिक करा – Partner By V P kale

खरेदी करण्यासाठी क्लिक करा – Goshta Hatatli Hoti by V P Kale

Treading

More Posts