Top 50 Motivational Marathi suvichar | प्रेरणादायी मराठी सुविचार
आयुष्य जगत असताना प्रत्येकाच्या वाट्याला सुख-दुःखांना सामोरे जाण्याचे प्रसंग येत असतात. (marathi suvichar) काही वेळेला आयुष्यात आपण आत्मसात केलेले विचार हेच आपले आयुष्य निडरपणे जगण्याची प्रेरणा देणारे असतात. आयुष्याच्या चढ-उतारात असे विचार वाचायला मिळाले की आपसुक जगण्याची प्रेरणा मिळून जाते. जिद्द आणि चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी हाच यशाचा राजमार्ग आहे. आणि यासाठी स्वतःमध्ये बदल करणे गरजेचे असते आणि सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे असते.
आणि असे प्रेरणादायी विचार तुम्ही शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. (Marathi suvichar) हे प्रेरणादायी विचार तुम्ही स्वतःआत्मसात करू शकता अथवा तुमच्या मित्रपरिवाराला पाठवून त्यांना प्रेरित करू शकतात

1 )“आयुष्यात कधीही स्वतःला कुणापेक्षा कमी समजू नये, आणि कोणापेक्षा श्रेष्ठही समजू नये, कारण स्वतःला कमी समजल्याने आत्मविश्वास कमी होतो.आणि श्रेष्ठ समजल्याने अहंकार निर्माण होतो”
2) स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही विचार करता त्यापेक्षा तुम्ही निडर आहात. तुम्हाला जितक वाटतं त्यापेक्षा अधिक कौशल्य तुमच्याजवळ आहे, आणि तुम्ही कल्पना करू शकत नाही इतक करायची तुमच्यात क्षमता आहे.
3) प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे
4) दुसऱ्यांच्या अपेक्षा आणि मतांपेक्षा तुमच्या उद्देश्य आणि ध्येयपूर्ती साठी आयुष्य जगा, कारण जग वेगळा विचार करणाऱ्याला सलाम ठोकते
5) आयुष्यात आपण अश्या गोष्टींची चिंता करत बसतो, ज्या कधी आपल्या आयुष्यात आलेल्याच नाहीत.
6) भूतकाळाला दोष देत रडत बसण्यापेक्षा वर्तनमानकाळाशी लढून भविष्यकाळ कसा सुधारता येईल हे करण्यात खरा पराक्रम आहे
7) अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.

8)” सल्ला घ्यायचा तर यशस्वी आणि अयशस्वी या दोघांचाही घ्या, कारण यशस्वी काय करायचं आहे ते सांगतो आणि अयशस्वी काय करू नये ते सांगतो”.
9) पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल, पण उधळण करायची ती सुगंधाचीच.
10) काळोख्या रात्री सुद्धा, आशेची एक मशाल पुरेशी असते एक नवा आशावाद घेवून जन्मोजन्मीचा अंधार पुसून टाकायला
11) आयुष्याच्या कॅनव्हास वर आपल्या चुका, अपयश आपल्याला सांगत असतात की आयुष्य कधीच perfect नसतं, पण आपल्यातल्या ह्याच चुका अपयशाचे क्षण आपल्या आयुष्याला मास्टरपीस बनवत असतात.
12) तुम्ही आयुष्य किती जगलात त्यापेक्षा ते कसे जगलात याला महत्त्व आहे
13) ” सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते. तर दुःख माणसाच्या धैर्याची दोन्ही परीक्षांमध्ये जो उत्तीर्ण होतो. तोच माणूस जीवनात यशस्वी होतो“.
50+ Marathi suvichar
click here to read – Top 10 marathi thoughts

14)” नेहमी सत्याच्या मार्गाने चला या मार्गाने अपघात कमी होतात कारण या मार्गाने येणाऱ्यांची संख्या फार कमी असते”.
15) एक ध्येय, एक स्वप्न, एक इच्छा तुमचं आयुष्य बदलू शकते…
16) माझ्या स्वप्नांना हे माहीत नाहीये की माझी दुःख किती मोठी आहेत, पण माझ्या दुःखाना हे जरूर माहिती आहे की माझी स्वप्नं किती मोठी आहेत.
17) नशिब म्हणजे दुसरं काही नसून जेव्हा तुमची तयारी तुमच्या संधीला मिळते ती वेळ म्हणजे नशिब.
18) दुःखानंतर येणारा आनंद सुखमय असतो.
19) अपयश हे यश्याच्या कधीच विरुद्ध अर्थी नसते, तो तर यशाचा एक भाग आहे ज्यामुळे यशाला किंमत येते. (Top 50 marathi suvichar for you.)
Click here to read – व. पु. काळे Marathi Thoughts (V.P.Kale Marathi quotes)

20) ” उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्यांचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते”.
21) आयुष्याच्या खेळात जर तुम्हाला कधी वाटले की तुम्ही थकला आहात, तर थोड थांबा पण खेळ सोडू नका…
22) यशाचा सूर्योदय पाहण्यासाठी मेहनतीचा डोंगर चढावा लागतो.
23) ती स्वप्नचं असतात जी आपल्याला आयुष्य जगणं शिकवतात मग ते जगणं कितीही खडतर असो.
24) “या जगात काहीचं कायस्वरूपी नाही, तुमची संकटेसुद्धा”
25) तुमचा वेळ मर्यादित आहे, कुणा दुसऱ्याच्या स्वप्नांसाठी ते फुकट घालवू नका…
26) संघर्ष हा आयुष्याचा आशिर्वाद आहे. संघर्ष आपल्याला संयमी बनवतो, संवेदनशील बनवतो, आणि संघर्ष शिकवतो की आयुष्य कितीही खडतर असलं तरी ते पार करता येत.
27) “आयुष्य असे जगा, की त्यामुळे एखाद्याला प्रेरणा मिळेल, जगण्याची ताकद मिळेल आणि हार न मानण्याची नवी उमेद मिळेल“ (inspirational marathi suvichar)
28) थांबला तो संपला.
29) स्वतःवर विश्वास ठेवणे खुप कठीण असते, तेव्हा जेव्हा कोणीच तुमच्यावर विश्वास ठेवत नाही, तुम्ही कोण आहात त्याचा अभिमान बाळगा, आणि तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा कारण या जगात काहीही शक्य आहे…
वाचा ही प्रेरणादायी आत्मकथा – Wings Of Fire Marathi Edition (Paperback, A. P. J. Abdul Kalam)
वाचा ही प्रेरणादायी पुस्तके – एक होता कार्व्हर