प्रत्येकाला आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी प्रेरणादायी विचारांची गरज असते…. तुमच्या साठी हा खास प्रेरणादायी विचारांचा Marathi Thoughts खजिना…
“ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. येतील कठीण प्रसंग फक्त चंद्र तारकांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका”
जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की
Marathi Thoughts
पायाला पाणी न लागता पण कुणी समुद्र पार करू शकतो पण माणसाचे आयुष्य अश्रू शिवाय पार करता येत नाही यालाच खरे आयुष्य म्हणतात.
स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.
कुठेही बोलतांना आपल्याशब्दाची उंची वाढवा आवाजाची उंची नको,कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजेच्या कडकडाटामुळे नव्हे.
“संकटाचे हेही दिवस जातील संयम ठेवा..आज जे तुम्हाला हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील.”
तुमच्या स्वप्नांना कधीही सांगू नका तुम्हाला किती अडचणी आहेत पण तुमच्या अडचणींना हे नक्की सांगा की तुमची स्वप्ने खुप मोठी आहेत
छत्री पावसाला थांबवू शकत नाही… पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही… पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.