Republic day Wishes in Marathi 2026 | प्रजासत्ताक दिनासाठी शुभेच्छा आणि संदेश.
भारतात दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन (Republic day) म्हणून साजरा केला जातो. (Republic day Wishes in Marathi 2026) यालाच गणराज्य दिन असेही म्हणतात. हा सण आपला राष्ट्रीय सण आहे. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रज राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले.
नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली लिहिलेले भारताचे संविधान २६ जानेवारी १९५० पासून अंमलात आले. म्हणून २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारी दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. हा उत्सव लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. भारतातील सर्व शासकीय, खाजगी संस्था तसेच शाळा, महाविद्यालये हा सण साजरा करून संविधानाबद्दल आदर व्यक्त करतात.

राहणार नाही कुणी अशिक्षित,
अशी चेतना घेवून येवू…
जाती-धर्मा चे भेद विसरून,
पुन्हा नव्याने एक होऊ…
प्रजासत्ताक दिवसाच्या असंख्य शुभेच्छा!!!
तीन रंगांचे नाही नुसते वस्त्र हे
हा आहे अपुल्या देशाची शान…
प्रत्येक भारतीयाच्या हृदयातला
आहे हा स्वाभिमान…
इथेच आहे गंगा, इथेच हिमालय
हा तिरंगा ह्या हिंदची जान
तीन रंगात रंगला
आज सारा हिंदुस्थान…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!!!
हजारो सलाम ह्या महान भारत भूमीला… ही महानता आणि समृद्धता अधिकाधिक वृद्धिंगत होवो…
भारताचा प्रजासत्ताक चिरायू होवो
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. Republic day wishes in Marathi 2026

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आम्ही देशाची आन बान
आम्ही देशाची संतान.
तीन रंगांचा तिरंगा
आहे आमची पहेचान.
प्रजासत्ताक दिनाच्या अनेक शुभेच्छा!!!
ही आन तिरंगा आहे,
ही शान तिरंगा आहे
अस्तित्व तिरंगा आहे
अभिमान तिरंगा आहे
happy republic day 2026
उत्सव तीन रंगांचा,
आभाळी सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी…
ज्यांनी भारत देश घडवला…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!! Republic day wishes in Marathi 2026
स्वप्नं नवी, भरारी नवी
समता, एकता, बंधुता
शिकवणारी समृद्ध
भारताची संस्कृती हवी
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा मराठी

देशभक्त च आहेत ह्या देशाची शान,
त्यांमुळेच आहे ह्या देशाला मान,
आम्ही त्या देशाचे पाईक आहोत,
ज्याच नाव आहे हिंदुस्थान
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तनी – मनी बहरुदे नवा जोम,
होऊ दे पुलकीत रोम- रोम…घे तिरंगा हाती,
नभी लहरू दे उंच उंच…
जयघोष मुखी – जय हिंद, गर्जू दे आसमंत
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!!!
मुक्त आमुचे आकाश सारे
झुलती हिरवी राने-वने…
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा…

ज्यांनी लिहिली आझादीची गाथा,
त्यांच्या चरणी ठेवितो माथा
Republic day Wishes in Marathi 2026
विजयी विश्व तिरंगा प्यारा,
झेंडा उचा रहे हमारा
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
जनता ही सर्व शक्ती स्वरुप आहे,
जनतेचं मन आणि आत्मविश्वास
हा गण तंत्राचा आधार आहे
जिथे माणुसकी असेल धर्म,
बंधूता असेल जात…
सर्वांचा होईल विकास,
आणि सामर्थ्य पसरेल जगात…
असा आदर्श भारत घडवुया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
जाती अनेक धर्म अनेक,
सर्वांचा नारा एकच आहे…
भारत मातेच रक्षण करणे,
हे आपले कर्तव्य आहे…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Indian constitution & Republic day Wishes in Marathi 2026

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस :
सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य ; दर्जाची व संधीची समानता ;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन ; आमच्या संविधांसभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
स्वातंत्र्य , समानता , एकता आणि बंधुता आहे या देशाच्या संविधानाचा पाया
चिरायू राहो ही लोकशाही आणि हे संविधान जे प्राप्त करण्यासाठी झिजवली असंख्य वीरांनी आपली काया
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो!!!
रंग स्वातंत्र्याचे, रंग हे तिरंग्याचे भिडूदे आकाशाला
ध्येय यशाची, सुख समृद्धीची मिळुदे साऱ्या जनतेला
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!!!
एक भारतीय असल्याचा जाज्वल्य अभिमान व आनंद वाटत आहे. तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
Republic day Wishes in Marathi 2026

हा देश तरुणांचा, सळसळत्या रक्तांचा
नव्याने भरारी घेत आहे,
आठवून आपला इतिहास, जगाला आपलं सामर्थ्य दाखवत आहे.
जय हिंद
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!!!
Republic day Wishes in Marathi 2026
प्रजासत्ताक दिन साजरा करताना,
झेंडा आकाशी उंच फडकवताना,
आपली महत्वकांक्षा आणि देशाला शिखरावर नेण्याची स्वप्नं साकार होण्यास प्रयत्न करूया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!!!
विकसित भारताचे स्वप्न पाहताना, आर्थिक प्रगतीकडे अग्रेसर होताना
एक क्षण त्यांना आठवूया ज्यांनी ह्या देशासाठी आपलं सर्वस्व दिल.
जय हिंद.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
Read – प्रेरणादायी मराठी सुविचार
Read – गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश
Read – स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा संदेश | Independence Day Quotes In Marathi.






