प्रधानमंत्री आवास योजना 2026 अर्ज प्रक्रिया | संपूर्ण माहिती, पात्रता, कागदपत्रे व ऑनलाइन अर्ज कसा करावा?
“सर्वांसाठी घर” हे उद्दिष्ट ठेवून सुरु केलेली Pradhan Mantri Awas Yojana (PMAY) 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. 2026 मध्ये तुम्ही स्वतःच घर घेणार असाल. तर अश्या सर्व कुटुंबांसाठी पक्के घर मिळवण्यासाठी ही योजना फायदेशीर आहे. या Blog मध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना 2026 अर्ज प्रक्रिया (PMAY 2026 online apply), पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अनुदानाची रक्कम, ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत, तसेच अर्जाची स्थिती कशी तपासावी याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) म्हणजे काय?
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) ही केंद्र सरकारची घरकुल योजना आहे. या योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), अल्प उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गट (MIG) यांना घर खरेदी/बांधकामासाठी अनुदान (Subsidy) दिले जाते.
ह्या योजनेचे दोन भागात विभाजन केलेले आहे:
2. PMAY-Gramin (ग्रामीण भागासाठी)
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2026 उद्दिष्ट:
सर्व कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देणे
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना गृहकर्जावर व्याज सवलत देणे
महिलांच्या नावावर घर नोंदणीला प्रोत्साहन
झोपडपट्टी पुनर्वसन
प्रधानमंत्री आवास योजना 2026 पात्रता (Eligibility):
प्रधानमंत्री आवास योजना 2026 अर्ज प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी खाली दिलेल्या पात्रता तपासणे आवश्यक आहे,
आवश्यक पात्रता व अटी:
अर्जदार भारतीय नागरिक असावा.
कुटुंबाकडे पक्के घर नसावे.
अर्जदाराचे नाव इतर कोणत्याही घरकुल योजनेत नसावे.
कुटुंबातील महिला सदस्याच्या नावावर घर नोंदणी असणे आवश्यक (शहरी योजनेत).

लाडकी बहीण योजना ई-केवायसी ऑनलाइन प्रक्रिया | Ladki Bahin Yojana eKYC Online Process 2025
प्रधानमंत्री आवास योजना 2026 नुसार किती अनुदान मिळेल ?
PMAY अंतर्गत गृहकर्जावर व्याज सवलत (CLSS) दिली जाते.
EWS/LIG – 6.5% व्याज सवलत (20 वर्षांपर्यंत)
MIG-I – 4% व्याज सवलत
MIG-II – 3% व्याज सवलत
योजने अंतर्गत जास्तीत जास्त ₹2.67 लाखांपर्यंत अनुदान मिळू शकते.
सरकारी घरकुल योजना माहिती
आवश्यक कागदपत्रे (Required Documents):
प्रधानमंत्री आवास योजना 2026 अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालील कागदपत्रे गरजेची आहेत:
आधार कार्ड
पॅन कार्ड
मतदान ओळखपत्र
उत्पन्नाचा दाखला
बँक पासबुक
रहिवासी प्रमाणपत्र
मालमत्तेचे कागदपत्र
पासपोर्ट साईज फोटो
प्रधानमंत्री आवास योजना 2026 अर्ज प्रक्रिया (PMAY Online Process):

Step 1: अधिकृत वेबसाईटला भेट द्या: (Visit official website)
PMAY-Urban साठी अधिकृत संकेतस्थळावर (Official website) जा.
Step 2: “Citizen Assessment” पर्याय निवडा:
या ठिकाणी आपल्या श्रेणीनुसार पर्याय निवडा.
Step 3: आधार क्रमांक टाका:
आधार प्रमाणीकरण पूर्ण करा.
Step 4: अर्ज फॉर्म भरा:
वैयक्तिक माहिती, पत्ता, उत्पन्न तपशील व कुटुंब सदस्यांची माहिती.
Step 5: अर्ज क्रमांक जतन करा:
फॉर्म सबमिट झाल्यानंतर अर्ज क्रमांक जतन करा किंवा नोंदवही (Diary) मध्ये लिहून ठेवा.
केंद्र सरकार योजना 2026
प्रधानमंत्री आवास योजना 2026 अर्ज प्रक्रिया ग्रामीण (Rural):
ग्रामीण भागासाठी अर्ज ग्रामपंचायत/सेवाकेंद्रामार्फत केला जातो. प्रधानमंत्री आवास योजना 2026 अर्ज प्रक्रिया ग्रामीण (Application Process) खाली पाहू,
प्रक्रिया:
ग्रामसेवकाकडे अर्ज जमा करा.
कागदपत्रे पडताळणी.
पात्रता निश्चिती.
मंजुरीनंतर हप्त्यांमध्ये अनुदान रक्कम जमा.
अर्जाची स्थिती कशी तपासावी? (How to track your assessment status?)
अधिकृत वेबसाईटवर जा (Go to official Website).
“Track Your Assessment Status” वर Click करा”.
अर्ज क्रमांक टाका. (Enter Application No.).
अर्जाची स्थिती पाहा.
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत बँका:
SBI, Bank Of Baroda, HDFC व ICICI अश्या अनेक राष्ट्रीयकृत व खासगी बँका या योजने मध्ये सहभागी आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना 2026 अर्ज प्रक्रिया भरताना महत्त्वाच्या सूचना (Important Instruction):
अर्ज भरताना सर्व माहिती अचूक भरा.
खोटी माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
आधार व मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक.
अर्जाची पावती जतन करा (Save Application No.).
प्रधानमंत्री आवास योजना 2026 अर्ज प्रक्रिया
अर्ज करताना होणाऱ्या चुका (Common mistakes while doing Application):
चुकीचा आधार नंबर – आधार कार्ड नंबर टाकताना एखादा नंबर जरी चुकीचा दिला तरी अर्ज नाकारला जाऊ शकतो.
चुकीचे उत्पन्न दाखवणे – शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी चुकीचे उत्पन्न दाखवले आणि फेरतपासणीत समजून आले तर अर्ज बाद होऊ शकतो.
बँक खाते mismatch – योग्य बँक खाते लिंक असणे खूप गरजेचे आहे.
PMAY 2.0 Update 2026:
सरकारने “Housing for All” या उद्दिष्टासाठी पहिल्या टप्प्यानंतर नवीन लक्ष्य, नवीन कालावधी आणि काही सुधारित अटींसह योजना पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. PMAY 2.0 म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेचा दुसरा टप्पा (Phase 2). पहिल्या टप्प्यात लाखो घरांना मंजुरी देण्यात आली. आता वाढती लोकसंख्या आणि शहरीकरण लक्षात घेऊन योजना पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
PMAY 2.0 चे मुख्य उद्दिष्ट:
2026 नंतरही घरकुल सहाय्य सुरू ठेवणे
शहरी गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना प्राधान्य जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना योजनेचा फायदा घेता येईल.
डिजिटल अर्ज व पडताळणी प्रक्रिया (Digital Application and verification process)
महिलांच्या नावावर मालकी प्रोत्साहन
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):
प्रधानमंत्री आवास योजना 2026 साठी कोण पात्र आहे? – ज्यांच्याकडे पक्के घर नाही आणि वार्षिक उत्पन्न ₹18 लाखांपर्यंत आहे ते पात्र आहेत.
अर्ज मंजूर होण्यासाठी किती वेळ लागतो? – कागदपत्र पडताळणीवर अवलंबून असते.
एका कुटुंबातील किती जण अर्ज करू शकतात? – फक्त एकच अर्ज ग्राह्य धरला जातो.
अनुदान थेट खात्यात जमा होते का? – होय, मंजुरीनंतर अनुदान रक्कम बँक खात्यात जमा होते.
महिलेचं नाव जोडणे आवश्यक आहे का? – शहरी भागात महिलेचं नाव जोडणे आवश्यक असते.
निष्कर्ष (Conclusion):
प्रधानमंत्री आवास योजना 2026 ही घर खरेदी किंवा बांधकामासाठी एक सुवर्णसंधी आहे. योग्य पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यास तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. जर तुमचे उत्पन्न EWS/LIG, MIG-I & II मध्ये असेल आणि स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न असेल, तर प्रधानमंत्री आवास योजना 2026 अर्ज प्रक्रिया त्वरित पूर्ण करा आणि शासनाच्या अनुदानाचा फायदा घ्या.






