Healthy Morning Routine for a Productive Day – ह्या सवयींनी करा तुमची सकाळ अधिक प्रोडक्टिव

दिवसाची सुरवात ही उर्जेने भरपूर झाली तर दिवसभराचा mood आणि एकाग्रता उत्तम राहते. यशस्वी आणि productive दिवसाची सुरवात ही योग्य दिनचर्येपासून (morning routine) होते. यशस्वी लोकांच्या आयुष्यातील morning routine, त्यांच्या सवयी त्यांच्या आयुष्यात खरे बदल ठरवतात. चला तर पाहूया सकाळी करायच्या काही सवयी ज्या तुमच्या जीवनाला अधिक productive आणि सकारात्मक बनवतील.

1. सकाळी लवकर उठणे

सकाळी ५-६ च्या दरम्यान उठल्याने मनाला ताजेतवाने वाटते. त्यासाठी आदल्या रात्री १०-११ वाजता झोपणे गरजेचे आहे. सकाळी वेळ शांत असल्याने ही वेळ ध्यान, व्यायाम आणि दिवसभराच्या नियोजनासाठी उत्तम असते. दररोज सकाळी उठण्याची वेळ ही नियमित असावी. ज्या दिवशी सुट्टी असेल त्यादिवशी देखील दररोज नेहमीच्या ठरलेल्या वेळेला उठावे. यामुळे natural sleep cycle routine तयार होते. दिवसभराची सर्व कामे वेळेवर आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सकाळी लवकर उठणे ही पहिली पायरी आहे. Morning routine in Marathi.

2. सकाळी detox water पिणे (Drinking detox water in Morning)

सकाळी उठल्यावर शरीर hydtret करणे गरजेचे आहे. सकाळच एक ग्लास पाणी तुमच मेटबॉलीझम सुरु करत. साधे कोमट पाणी पिण्याचे देखील खूप फायदे आहेत. अतिरिक्त फायदे मिळवण्यासाठी आपण detox वाटर पिवू शकतो. साध्या पाण्यात लिंबू, काकडी, पुदिना, आलं किंवा फळांचे तुकडे टाकून आपण detox water बनवू शकतो. शरीरातून toxins बाहेर काढण्यासाठी हे पाणी खूप लाभदायक ठरते. Productive Morning Routine मधे ही Habit सवय असण महत्वाचं आहे,

डिटॉक्स वॉटर चे फायदे:

1. पचन सुधारते
2.टॉक्सिन्स काढते
3.ताजेतवाने वाटते
4.वजन कमी करण्यास मदतगार
5.त्वचेचा glow वाढवते.

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी 10 सोपे उपाय। mental health tips in Marathi.

Healthy Morning routine for a Productive day

Yoga for powerpack Morning routine

3. ध्यान आणि योग:

ध्यान आणि योग सकाळच्या वेळेस केल्याने एकाग्रता वाढवण्यास मदत होते. त्यामुळे दिवसभराच्या धकाधकीच्या जीवनात ताण-तणावापासून दूर राहण्यास मदत होते. तसेच एकाग्रता व सकारात्मक विचार यांमुळे subconscious mind मधे सकारात्मक विचारांची पेरणी उत्तम होते. (Morning routine for productive day) योग आणि ध्यानमुळे आत्मविश्वास वाढतो. मानसिक आरोग्य सुधारते आणि रात्रीची झोपही उत्तम लागते. सकाळची दिनचर्या योग आणि ध्यानाशिवाय अपूर्ण आहे.

सकाळी करण्यासारखी सोपी योगासनं:

  1. सूर्यनमस्कार 2. प्राणायाम 3. ताडासन 4. भुजंगासन 5. वृक्षासन

सूर्य नमस्कार करण्याची सोपी पद्धत | सूर्य नमस्कार कसा करावा | Surya Namaskar for Beginners 

नियमित करा ताडासन | Tadasana Yoga Pose

4. व्यायाम (morning exercise):

सकाळच्या व्यायामामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा राहते. सकाळी oxygen ची पातळी जास्त असल्याने शरीराला भरभरून ऑक्सीजन मिळतो.
cardio, bodyweight exercises तसेच स्ट्रेचिंग (streching) तुमच्या morning routin ला जबरदस्त kickstart देतात. धावणे/ जॉगिंग/ जलद चालणे यामुळे (हृदयाचे आरोग्य उत्तम राहते, वजन देखील नियंत्रणात ठेवता येते)
push-ups, sqats, plank यामुळे स्नायू बळकट होऊन स्टामिना वाढवण्यास मदत होते.
एकूणच सकाळी केलेल्या व्यायामामुळे दिवसभर ऊर्जा टिकते आणि शरीर तंदरूस्त राहते.

5. पौष्टिक नाश्ता (Healthy Morning routine Breakfast):

सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वपूर्ण आहार आहे. शरीराला दिवसभर कार्यक्षम ठेवण्यासाठी सकाळचा नाश्ता हा healthy व सर्व प्रकारच्या nutrition नी भरपुर असावा.

नाश्ता मधे seasonal fruits ( मौसमी फळे) चा समावेश असावा जसे की केळी, पपई व कलिंगड सारखी फळे सहज उपलब्ध होतील अशी फळे उत्तम. फळांचा ज्यूस टाळावे कारण अख्या फळातील फायबर हे blood sugar control करण्यास लाभदायक असते. तसेच नाश्तामध्ये सुखा मेवा मधे बदाम, काजू आणि अक्रोड यांचा समावेश असावा. त्याचप्रमाणे ओट्स, पोहा सारखा नाश्ता अधिक वेळ भूक नियंत्रित करण्यास मदत करतो.

झटपट बनणारे काही detox breakfast recepies (सकाळचा हेल्दी नाश्ता):

ओट्स + ड्रायफ्रूट्स बाउल

दूधात शिजवलेले ओट्स + बदाम, अक्रोड, मनुका.

हवे असल्यास थोडं मध किंवा दालचिनी पावडर.

फायदा: पोटभर राहतं, ऊर्जा दिवसभर टिकते.

उपमा + ताक

भाज्यांनी भरलेला रव्याचा उपमा.

सोबत एक ग्लास ताक.

फायदा: प्रोटीन आणि फायबर मिळतो, पचन हलकं राहतं.

6. सकारात्मक वाचन / Affirmations का महत्त्वाचे?

दिवसाची सकारात्मक सुरवात तुमचा संपुर्ण दिवस आनंदी व productive करतो. म्हणून subconcious mind मधे सकारात्मक विचारांची पेरणी करणे गरजेचं आहे. सकाळच्या routine मधे थोडा वेळ तरी वाचनास देणे गरजेचे आहे. तुम्ही प्रेरणादायी पुस्तके, self help books किंवा बायोग्राफीज वाचू शकतात. वाचन झाले की ५ मिनिटे affermations वाचा.

उदाहरणार्थ:
१. ⁠माझ्या आयुष्यात शांति आणि भरभराट आहे.
२. यश मिळवण्यासाठी लागणाऱ्या सर्व
क्षमता माझ्याकडे आहेत.
३. आजचा दिवस माझ्यासाठी नवीन संधी घेवून येणार आहे.
४. ⁠मी निरोगी, आनंदी आणि आत्मविश्वासू आहे.
५. मी प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहतो.

तुमच्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी 120+ सकारात्मक दैनिक पुष्टी (Daily Affermations)

Plan your day with To-Do List

दिवसाचे नियोजन करा (Plan Your Day):

सकाळी वेळ काढून To-do list तयार करा, ज्यामुळे काम प्राधान्य क्रमानुसार करता येईल ज्यामुळे वेळही वाचेल आणि productivity वाढेल.

Treading

More Posts