Makar sankranti 2025 Wishes | मकरसंक्रांती महत्त्व आणि शुभेच्छा!

इंग्रजी नवीन वर्ष सुरु झाल्यानंतर येणारा मकरसंक्रांती (Makar sankranti 2025) हा पहिलाच सण, या वर्षी मकरसंक्रांती १४ जानेवारी ला साजरी होईल. गूळात बनवलेले तीळाचे लाडू एकमेकांना देऊन “तिळगुळ घ्या गोड गोड बोला” असे म्हणून एकमेकांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या जातात. मकर संक्रांतीला सुर्य मकर राशीत प्रवेश करतो यालाच उत्तरायण असे देखील म्हणतात. हा वातावरणातील बदल म्हणून देखील हा सण साजरा केला जातो. वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा करतात. महाराष्ट्रात हा सण तीन दिवस म्हणजेच भोगी, संक्रात व किंक्रांत असा साजरा केला जातो. एकमेकांना तिळगुळ आणि स्त्रियांना वाण वाटून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया यादिवशी नंतर हळदी-कुंकू सुरवात करतात. रथसप्तमी दिवशी हळदी कुंकू चा शेवट दिवस असतो.

मकरसंक्रांती पौराणिक महत्त्व

पौराणिक कथेनुसार महाभारतातील योद्धा भीष्म पितामह यांना मुळात इच्छा-मरणाच वरदान होत. (Makar sankranti 2025 Wishes in marathi) अर्जुनाचा बाण लागल्यावर भीष्म पितामह यांनी प्राण सोडण्यासाठी उत्तरायण होण्याची वाट पाहिली. कारण दक्षिणायन मधे मृत्यू झाल्यावर मनुष्याला मोक्ष प्राप्ती होत नाही. म्हणून महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा सूर्य उत्तरायण झाले तेव्हा भीष्म पीतामहानी आपल प्राण सोडल. म्हणून उत्तरायणास महत्त्व आहे.

मकर संक्रांती २०२५ शुभ मुहूर्त (Makar sankranti 2025)

मकरसंक्रांती दिवशी दान धर्म करण्यास सकाळी ०९:०३ ते १०.४८ असेल. याशिवाय शुभ वेळ सकाळी ०९:०३ ते संध्याकाळी ५.४६ पर्यंत असेल. यादिवशी नदीत केलेले पवित्र स्नान आणि गरजवंताना केलेले दान शुभ समजले जाते.

मकरसंक्रांती सुगड पूजन कसे करावे?

महिला मकरसंक्राती दिवशी सुगड पूजा करतात. सुगड हा सुघट ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे. घटात पिकलेलं धान्य ठेवून त्याची पूजा करतात. त्यात हरभरा, गाजर, ऊस, बाजरीच्या लोंबी, बोरं, तीळ असे साहित्य भरून ते चौरंगी मांडावर ठेवले जाते. पाटावर छान रांगोळी काढून पाटावर तांबडे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवले जाते आणि सुगड मांडले जाते
सुगडाला हळदी कुंकू लावून उभ्या रेषा लावून सजवावे.
काळ मोठं सुगडं खाली त्यावर लाल सुगड ठेवून दोन्हीत वाण भरतात. सुगडाला अक्षता-फुले वाहिली जातात व हळद कुंकू लावून नमस्कार करतात.

तिळा-गूळाचा गोडवा
एकमेकांस वाटून वाढवू
सण उत्साहाचा, एकत्र मिळून
अधिक आनंदी करु!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा!!!

समृद्धीचा पतंग, उंच उंच उडूदे,
नात्यात तिळगुळाचा गोडवा येवुदे,
उत्साह, आनंदाने घर सारे भरू दे
मोठांच्या आशीर्वादाने आयुष्य सजू दे
मकरसंक्रांती निमित्त गोड गोड शुभेच्छा!!!

Makar sankranti 2025

कणभर तिळाचा, मनभर गोडवा
यशाचा पतंग उंच उंच उडवा..
मकर संक्राती निमित्त गोड गोड शुभेच्छा!!!

तिळगुळाचा गोडवा, मनात यावा
यश, कीर्तीचा पतंग आसमंती उडावा
गोड शब्दांनी आपुलकी ला बहर यावा
सोबतीने आपल्यांच्या दिवस गोड व्हावा
मकरसंक्रांतीच्या मंगलमय शुभेच्छा!!!

दुःख असावे तीळासारखे,
आनंद असावा गूळासारखा
जीवन असावे तिळगुळासारखे,
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला…!!!

Makar sankranti Wishes 2025

तीळाची ऊब लाभो तुम्हाला,
गूळाचा गोडवा येवो जीवनाला
यशाची पतंग उडो गगनावरती,
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
शुभ संक्राती

Makar sankranti 2025 | मकर संक्रांती महत्त्व आणि शुभेच्छा!

आठवण सूर्याची, साठवण प्रेमाची,
कणभर तीळ, मनभर प्रेम,
गूळाचा गोडवा, स्नेह वाढवा
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

गोड नाती गोड सण
तुम्हाला मिळो खूप धन
आनंद ऐश्वर्य सुख समृद्धी
राहो तुमच्या अंगणी
तिळगुळ घ्या गोड बोला
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Makar sankranti Wishes 2025

मराठी अस्मिता, मराठी सण
मराठी संस्कृतीची मराठी शान,
आज संक्रातीचा सण
घेवून आला नवचैतन्याची खाण
तिळगुळ घ्या.. गोड गोड बोला…!
मकरसंक्रांती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!!

वर्ष नवे, हर्ष नवा
मकरसंक्रांतीच्या सणाला
तिळगुळाचा गोडवा
मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा!!!

सूर्यदेवाचा आशिर्वाद लाभू दे तुम्हाला,
सुखं आणि समृद्धीने उजळूदे आयुष्याला
शुभेच्छा देतो तुम्हाला गोड अश्या सणाला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
मकरसंक्रांतीच्या मंगलमय शुभेच्छा!!!

Makar sankranti Wishes in Marathi 2025

सुगड रचू, तिळगूळ वाटू
साजरे करू मकर संक्रमण
नाती जपू, पतंग उडवू
साजरा करू हा मराठी सण
मकरसंक्रांतीच्या मंगलमय शुभेच्छा!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

रंगबीरंगी पतंगाना उडूदे आकाशात,
सूर्याचा प्रकाश भिनुदे शरीरात…
सकारात्मकता आणि सहकार्याने
गोड तिळगुळाने साजरी करू संक्रांत…
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

मकरसंक्रांतीचा सण उत्साहाचे क्षण
गोड गोड तिळगुळ, आनंदी मन…
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…

मकरसंक्रांतीचा सण उत्साहाचे क्षण
गोड गोड तिळगुळ, आनंदी मन…
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…

नाती आपली हळूवार जपूया
तिळगुळासंग अधिक दृढ करूया
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Read – प्रजासत्ताक दिनासाठी शुभेच्छा आणि संदेश.

Read – Good morning quotes in Marathi and English

Read- व. पु. काळे Marathi Thoughts

Treading

More Posts