Mahabaleshwar Itinerary for 3 days – Perfect Travel Guide for 2025
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक आहे. जर तुम्हाला महाबळेश्वर पाहायच असेल तर ३ दिवसांचा महाबळेश्वर फिरस्तीचा प्लॅन (Mahabaleshwar 3-Day Itinerary – Perfect Travel Guide for 2025) आम्ही घेवून आलो आहोत. ही itinerary तुम्हाला उत्तम viewpoints, मंदिरे (temples), खाण्याची ठिकाण (food spots), strawberry farms हे सर्व explore करायला मदत करेल.
तुम्ही couple असा किंवा फॅमिली वा फ्रेंडस ग्रुप ही खात्रीने तुमचा प्रवास आरामदायी व आठवणीत राहील अशी होईल
पहिला दिवस – महाबळेश्वरची सुरुवात (Day 1)
आगमन आणि निवास : (Arrival and Stay)
पुणे मुंबईहून महाबळेश्वर 5-6 तासावर आहे. तुम्ही इतर ठिकाणाहून येणार असाल तर बजेट नुसार एक उत्तम होमस्टे/ हॉटेल किंवा रिसोर्ट निवडा. जेणेकरून चेक इन करून प्रवासाच्या थकव्यानंतर फिरण्यासाठी तयार होता येईल.
महाबळेश्वर मंदिर दर्शन (Mahabaleshwar temple):
स्थान – Location – old Mahabaleshwar
महाबळेश्वर मंदिर हे भगवान शंकर यांना समर्पित असून हे मंदिर दक्षिण भारतीय हेमाडपंती वास्तुशैलीचे एक उत्तम उदाहरण आहे. शिवलिंग स्वयंभू असल्याने ह्या जागेचे आध्यात्मिक महत्त्व खूप आहे. येथे दर्शन घेवून थोडा वेळ ध्यानासाठी नक्की ठेवा कारण मंदिर परिसरात शांति आणि अध्यात्मिक वातावरणात मन प्रसन्न होईल.
कृष्णाबाई मंदिर दर्शन (Krishnabai temple):

स्थान – Location – Near Mahabaleshwar temple भगवान शिवाचे हेमाडपंती प्राचीन वस्तुशैलीतील हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. सुंदर कृष्णा खोऱ्याकडे नजर ठेवून उभे असलेले हे मंदिर कृष्णा नदीचे उगमस्थान मानले जाते. महाबळेश्वर मंदिराच्या जवळच हे देखील पाहण्यासारखे मंदिर आहे

पंचगंगा मंदिर: (Panchganga temple):
स्थान – Location – Near Mahabaleshwar temple पंचगंगा मंदिर हे प्राचीन धार्मिक स्थळ आहे. कृष्णा, कोयना, गायत्री, सावित्री आणि वेणा या नद्यांचं उगम होतो असा विश्वास आहे. अत्यंत मनोहक असे हे मंदिरास पर्यटक आस्थेने भेट देतात.
जवळपास असलेले अतिबळेश्वर मंदिर देखील तुम्ही पाहू शकतात. अश्या प्रकारे ट्रिप ची सुरवात देखील देव दर्शनाने होईल.
पॉईंट्सची सफर (Viewpoints)
आर्थर सीट पॉइंट – (Arthur’s Seat Point) या पॉईंट्स ला “queen of points” अस देखील म्हणतात. तुम्ही पॉईंट्स पाहण्याची सुरवात करू शकतात.
इथून दिसणारा सावित्री घाटाचा नजारा आणि खोल दऱ्या मन मोहून टाकतात. जवळच Echo point, Tiger point आणि window point ला तुम्ही भेट देऊ शकतात. या मार्गात तुम्ही Hunter point, Malcom point, savitri point तुम्ही पाहू शकतात.
तुमच्या स्टे लोकेशन (stay location), वेळे च्या नियोजनाप्रमाणे पुढील पॉइंट्स तुमच्या itinerary मध्ये add करु शकतात. Kate’s Point, Bombay point, Elephant head point, Lodwick point & connaught peak.
दुसरा दिवस (Day 2):
वेण्णा लेक (Venna Lake)
दुसरा दिवसाची सुरवात करण्यासाठी वेण्णा लेक उत्तम ठिकाण आहे. सकाळच शांत वातावरण, सकाळी धुक्यात पडणारे सूर्यकिरण अत्यंत विलोभनीय वाटतात. सकाळी गर्दी कमी असल्याने ही वेळ तलाव पाहण्यासाठी उत्तम आहे. येथे तुम्ही बोटिंग तसेच घोडस्वारीचा आनंद घेवू शकतात.

मॅप्रो गार्डन (mapro garden):
महाबळेश्वर ला गेलात तर मॅप्रो गार्डन (mapro garden) शिवाय ट्रिप अधुरी आहे. पाचगणी-महाबळेश्वर रोड लगत असलेले हे सुंदर गार्डन निसर्ग, चवदार पदार्थ आणि स्ट्रॉबेरी संस्कृती यांचं छोटस जग आहे. दिवसभर हे ठिकाण पर्यटकांनी भरलेलं असतं. इकडे मॅप्रो गार्डन कॅफे मधे strawberry with fresh cream, wood fired pizza हे येथील लोकप्रिय पदार्थ आहेत.
तापोळा – मिनी काश्मीर:
महाबळेश्वर पासून २५ किमी वर असणारे हे सुंदर ठिकाण शांतता, हिरव्यागार दऱ्या आणि विशाल जलाशयासाठी प्रसिद्ध आहे. विशाल जलाशय व सभोवतालच्या विशाल पर्वतरांगांमुळे ह्या भागाला मिनी काश्मीर म्हणून ओळखले जातात. तापोळा मध्ये तुम्ही स्पीड बोट राईड (speed boat ride), कायकिंग (kayaking), फोटोग्राफी तुम्ही करू शकतात. सूर्यास्तानंतर महाबळेश्वर परतताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना थंड हवा, शांत वातावरण दिवसभराचा थकवा दूर करतात.
तिसरा दिवस (Day 3):

प्रतापगड (Pratapgad):
१९५६ साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाने बांधलेला हा किल्ला १९६६ साली झालेल्या महाराज आणि अफझलखान यांच्यातील लढाईसाठी प्रसिद्ध आहे. किल्ल्याच्या खालच्या भागात भवानी माता मंदिर आहे. बालेकिल्ल्यावरून कोकण व घाटांचा ३६०° व्ह्यू दिसतो. महाबळेश्वर पासून जवळ असल्यामुळे हे प्रेरणादायी ऐतिहासिक स्थळ पहायलाच हवे.
शिवकालीन खेडेगाव:
जुन्या सांस्कृतिक अनुभवांचा ठेवा असलेली ही शिवसृष्टी आवर्जून पाहावी अशी आहे. दगडी कुंपण, लाकडी घर, गोठा, बैलगाडी, विहीर पालखी, जुना वाडा वृंदावन सार आपल्याला ३०० वर्षे माग घेऊन जात. फोटो काढण्यासाठी ही खूप छान जागा आहे. प्रतापगडाच्या जवळ असलेली ही जागा आवर्जून भेट द्यावी अशी आहे.
Healthy Morning Routine for a Productive Day – ह्या सवयींनी करा तुमची सकाळ अधिक प्रोडक्टिव
महाबळेश्वरसाठी प्रवास टिप्स
साइटसीइंगसाठी लवकर सुरुवात करा, जेणेकरून अधिक ठिकाणे निवांत पाहता येतील.
हिवाळ्यात हलके उबदार कपडे बरोबर ठेवा.
लाँग विकेंडमध्ये हॉटेल्स आधीच बुक करा, कारण गर्दी जास्त असते.
महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी क्रीम आणि कॉर्न पॅटी नक्की चाखा.
निष्कर्ष:
महाबळेश्वरची ३ दिवसांची सहल म्हणजे शहराच्या गोंगाटापासून दूर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात ताजेतवाने होण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. शांत व्ह्यू पॉइंट्स, ऐतिहासिक स्थळे, चविष्ट अन्न आणि आल्हाददायक हवामान—हे सर्व मिळून महाबळेश्वर महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पर्यटनस्थळांपैकी एक बनते.
ही इटिनररी फॉलो करा आणि तुमचा महाबळेश्वर ट्रिपचा अनुभव अधिक सुंदर आणि संस्मरणीय बनवा.






