गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश | guru purnima wishes in marathi.
गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर… गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः… (guru purnima wishes in marathi) गुरूपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. मनुष्य हा आयुष्यभराचा विद्यार्थी आहे. आणि विद्यार्थ्यांच आयुष्य हे समुद्रात तरंगणाऱ्या होडीसारखं असतं, ज्याला योग्य ठिकाणी जाण्यासाठी गुरु रुपी दीपस्थंब (लाइटहाउस) मिळणे गरजेचे असते. अश्या वेळी गुरु शिवाय आयुष्य हे समुद्रात भरकटलेल्या नावेप्रमाणे होते. म्हणून आयुष्यात गुरूरूपी दीपस्थंब असणे खूप गरजेचे आहे.
महर्षी व्यास ज्यांनी महाभारत लिखाण केले त्यांना वंदन करण्याचा हा दिवस. (guru purnima wishes in marathi) म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. ह्या दिवशी आपण आपल्या जीवनातल गुरुरूपी व्यक्तिमत्वांना वंदन करून त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करू शकतो. त्यासाठी शुभेच्छा संदेश आम्ही घेवून आलो आहोत. तुमच्या गुरुजनांना हे शुभेच्छा संदेश पाठवून तुमच्या गुरूंना मानवंदना द्या.
माझे आई-वडिल, शिक्षक, माझे भाऊ, पत्नी व मुले तसेच आयुष्याच्या प्रवासात आधार देणारे मित्रमंडळी, नातेवाईक, समाजातील ज्ञात, अज्ञात व्यक्ती हे सर्व मला वंदनीय आहेत.
अश्या सर्व गुरुसमान व्यक्तिमत्वांना ज्यांच्यामुळे जीवनात काही शिकता आले त्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!

गुरु ज्ञानाचे मंदिर, गुरु आत्मा परमेश्वर,
गुरु जीवनाचा आधार, गुरु यशाचे द्वार,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!!!
“गुरूंशिवाय ज्ञान नसते, आणि ज्ञानाशिवाय आत्मा ओळखणे शक्य नाही”
“आयुष्याच्या अवघड डोंगर वाटांत, जो मार्ग दाखवतो तोच खरा गुरु…”
“शिष्याच्या लोखंडरूपी आयुष्यात परिस बनून येणाऱ्या सर्व गुरूंना
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!”

“गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर… गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः”
“लागू सत्कर्माच्या ध्यानी, गुरुमूर्ती ठेवून मनी
मिळेल यश कीर्ती संपदा, ठेवू गुरु विचार सोबती क्षणोक्षणी.” गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!!!
“गुरू हा परिससारखा असतो, त्याला कश्यानेही तोलू शकत नाही, कारण जो दगडालाही देवपण देतो त्याला गुरु म्हणतात…
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!!!”
“जो लिहायला वाचायला शिकवतो तो शिक्षक, आणि जो जीवनाचे ज्ञान शिकवतो तो गुरु!!!
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!!!”
Click here to read – व. पु. काळे Marathi Thoughts (V.P.Kale Marathi quotes)
Guru purnima wishes in marathi.

“ज्यांनी मला घडवलं या
जगात लढायला जगायला शिकवलं
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे
गुरू पौणिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा”
“गुरु हा आधार, गुरु म्हणजे माऊली
वाळवंट आयुष्याला, सुखाची सावली” गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!!!”
“सत्कर्माची ओळख देवून, सदाचरणाची कास धरायला लावतो,
आणि सदसद्विवेकबुद्धीने सद्वस्तू ची ओळख देतो तो खरा सद्गुरू गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा !!!”
guru purnima wishes in marathi. गुरू पौर्णिमा शुभेच्छा
Click here to read – Top 50 Marathi suvichar

“ना वयाचे बंधन, ना नात्याचे जोड
ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई निस्वार्थ दान,
गुरु त्यासी मानवा, देव तेथेची जाणावा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!!!
गुरु आणि रस्ता यात साम्य आहे,
दोघंही आपल्या जागेवरच असतात मात्र दुसऱ्यांना त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोहचवण्याचं काम करतात. व्यासपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!!
गुरु हा संतकुळीचा राजा | गुरु हा प्राणविसावा माझा
व्यासपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!!

“काळोखाची रात्र असावी त्यात साथ कंदिलाची मिळावी, देव्हाऱ्यात वात तैवत राहावी, सर्वांना दीर्घायुष्याची शिदोरी लाभावी गुरुंना माझा नमस्कार आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा”
“आज गुरु प्रति कृतज्ञता व्यक्त करायचा दिवस
माझ्या आयुष्यातल्या सर्व गुरुजनाना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!”
ज्ञानविरहित जे जे केले | तें तें जन्मासी मूळ जालें |
म्हणोंनी श्री सद्गुरूंची पाऊले | सदृढ धरावी | व्यासपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!!
“तुमच्या सन्मानाचा आधार हे गुरूंमुळे मिळालेल ज्ञान आहे ही जाणीव असेल तर आयुष्य सार्थक आहे” happy gurupurnima 🙏🏻
दिले ज्ञानाचे भंडार
केलं भविष्यासाठी तयार
राहू नेहमी कृतज्ञ
ज्यांमुळे आयुष्य झाले साकार
happy gurupurnima 🙏🏻

“गुरु आहे सावली, गुरु आहे आधार गुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार, गुरु आहे अंबरात, गुरु आहे सागरात, शिकावे ध्यान लावुनी, गुरु आहे चराचरात, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!“
जय जयाजी स्वामी सर्वेश्वरा | आम्हा अनाथांचिया माहेरा |
सार्थक झाले जी दातारा | तुमच्या कृपा कटाक्षे | माझ्या आयुष्यातल्या सर्व गुरुजनाना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!” Guru purnima Wishes
गुरौ न प्राप्यते यत्तन्नान्यत्रापि हि लभ्यते |
गुरुप्रसादात सर्व तु प्राप्नोत्येव न संशय: ||
(sanskrit shloka) अर्थ – जे गुरु कडून प्राप्त होत नाही ते कुठूनच प्राप्त होणार नाही, गुरु कृपा असेल तर मनुष्य सर्व काही मिळवू शकतो
Please check Blog on – Moringa tree: The Miracle Plant Benefits
Please check Blog on – How to get more deep sleep: A Guide to Enhancing Restfulness.
Please check Blog on – Ashwagandha Gummies-The Ultimate Guide