Diwali wishes in Marathi 2025 | दिवाळी शुभेच्छा संदेश

दिवाळी हा प्राचीन काळापासून मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा भारतातील मोठा सण आहे. (Diwali wishes in Marathi) दिवाळी म्हणजे “असत्यावर सत्याचा विजय” आणि “अंधारावर प्रकाशाचा विजय” होय. हा एक पवित्र हिंदू सण आहे. परंतु हा सण केवळ धार्मिक श्रद्धेच प्रतीकच नसून या सणाचे अध्यात्मिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि आर्थिक देखील महत्व आहे. हा सण सामाजिक ऐक्य वाढवण्याचे काम करतो.

हा सण दरवर्षी अश्विन आणि कार्तिक महिन्याच्या संधिकाळात असतो सणादिवशी दिवे पणत्या लावल्या जातात, अंगणाची स्वच्छता करून रांगोळी काढली जाते. (Diwali wishes in Marathi) दिवाळी हा सण फक्त एक सण नसून आनंद व प्रेम वाटण्याची संधी आहे. आणि ह्या सणासाठी तुम्ही खालील शुभेच्छा प्रियजनांना देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करू शकतात.

Diwali 2025 celebration in Maharashtra with Marathi wishes

“तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!”

Visit my Blog – वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy birthday wishes in marathi

दीप जळत राहो तुमच्या आयुष्यात
तेजाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा
रांगोळीप्रमाणे आयुष्य तुमचे
नेहमी यशाने सजलेले राहू दे
या दिवाळी सणाच्या तुम्हाला सर्व सुख मिळो
शुभ दीपावली

उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट
दिव्यांची आरास, फराळाचे ताट
फटाक्यांची आतषबाजी, आनंदाची लाट
नूतन वर्षाची चाहूल घेवून आली दिवाळी पहाट
शुभ दीपावली…

घेवून दिव्यांचा प्रकाश सोनेरी.
माळोन गंध मधुर उटण्याचा…
करा संकल्प सुंदर जगण्याचा
गाठुनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा
दिवाळी निमित्त मंगलमय शुभेच्छा…

Diwali wishes in marathi

“दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!!”

Typing tool – For Marathi typing.

आयुष्यात,
चकलीसारखे खुसखुशीत क्षणही येतात,
करंजीसारखे गोड क्षणही येतात
शंकरपाळी अनारश्यासाठी कुरकुरीत
चिवड्यासारखे तिखट क्षणही येतात,
“आपली माणसं ओळखण्यासाठी”
सरते शेवटी सांगणे एवढेच की आयुष्याचा ‘फराळ’ होऊन देऊ नका
आक्षकंदीलाच्या प्रकाशाप्रमाणे तुमचे जीवन प्रकाशमान होवो
दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…

मनाच्या मातीची उजळो पणती
नाती आणि मती तेजाळाया…
जाणिवांना राहो, वास्तवाचे भान
वसो समाधान अंतरंगी
दिवाळीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा…

Diwali wishes in marathi

यशाची रोषणाई, कीर्तीचे अभ्यंग स्नान,

मनाचे लक्ष्मीपूजन, समृद्धीचा फराळ,

प्रेमाची भाऊबीज अशा दिवाळीच्या आनंददायी शुभेच्छा!

स्नेहाचा सुगंध दरवळला
आनंदाचा सण आला
एकच मागणे दिवाळी सणाला
सौख्य समृद्धी लाभो सर्वांना
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…

Diwali Wishes in Marathi 2025

विरो अंतर्बाह्य अंधाराचे भय
तेजाचे वलय उमलोनी
उजळो अंतरी जाणिवेची ज्योत
जुळो गणगोत चैतन्याशी
दीपावली शुभेच्छा…

सगळा आनंद सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता
यशाची सगळी शिखर
सगळं ऐश्वर्य
हे आपल्याला मिळू दे…
ही दीपावली आपल्या आयुष्याला
एक नवा उजळा देऊ दे
दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा…

आनंददायी वाटणारे आकाशकंदील,
सुफळ जेवणासाठी सजावट
वाईटाचा नाश करण्यासाठी फटाके
यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मिठाई
आणि देवाचे आभार मानण्यासाठी दिवाळीचे दिवे.
शुभ दीपावली

सोनेरी प्रकाशात,
पहाट सारी न्हावून गेली,
आनंदाची उधळण करीत,
आली दिवाळी आली…

नवे लेणे भरजरी,
दारी रांगोळी न्यारी,
गंध प्रेमाचा उधळीत,
आली आली दिवाळी आली….

नवा गंध नवा वास,
नव्या रांगोळीची नवी आरास
स्वप्नांतले रंग नवे
आकाशातले असंख्य दिवे
शुभ दीपावली

Diwali Wishes in Marathi 2025

सगळा आनंद सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता
यशाची सगळी शिखर
सगळं ऐश्वर्य
हे आपल्याला मिळू दे
ही दिपावली आपल्या आयुष्याला
एक नवा उजाळा देऊ दे
दिपावलीच्या तेजोमय शुभेच्छा…

Diwali wishes in marathi

आकाशदिवे, पणत्या, रांगोळ्या पक्वान्ने, सजावट ही सगळी आनंदाची बाह्यरूप
एकमेकांबद्दल मनातून वाटणाऱ्या भावनांची ती केवळ प्रतिक असतात.
खरी दिवाळी असते मनामनात…
आपल्या एकमेकांबद्दल वाटणारा स्नेह, प्रेम, वात्सल्य, आपलेपणा हिच खरी दिवाळी मनामनांची…
म्हणूनच ह्या शुभेच्छा दिवाळीच्या मनांकडून मनांकडे
diwali wishes in marathi 2025

दिव्यांची आरास
फुलांचा सुवास
घेवून आला पाडवा
आनंदाचा प्रकाश !
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…

फटाक्यांची माळ,
विजेची रोषणाई,
पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ,
रांगोळीची रंगत,
फराळाची संगत
लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ,
दीपावलीचा सण आहे खूपच गोड
दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा…
diwali wishes in marathi 2025

निष्कर्ष:

दिवाळी हा केवळ प्रकाशाचा सण नाही. तर नात्यांचा सण आहे. या दिवाळी शुभेच्छा प्रियजनांना पाठवून २०२५ ची ही दिवाळी अविस्मरणीय बनवा!

“आनंदी रहा, समृद्ध रहा, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!”

Bhaubeej Wishes in Marathi 2025 | भावाला पाठवा भाऊबीजेच्या खास शुभेच्छा !!!

lakshmi pujan 2025 Date, Timings & Wishes in Marathi | लक्ष्मी पूजन समृद्धीसाठी शुभेच्छा

click here Buy Home Rangoli Diya

Treading

More Posts