50+ Elegant Marathi ukhane for female |स्त्रियांसाठी छान मराठी उखाणे

आपल्या मराठी संस्कृती मधे विविध समारंभात पत्नी किंवा पती ला नाव (Marathi ukhane for female) घेण्यास लावले जाते. त्यालाच उखाणा घेणे असे देखील म्हटले जाते. खासकरून नववधू व वर यांस आग्रहाने नातेवाईकांकडून उखाणा घेण्यास सांगितले जाते.
उखाणे घेण्याची महाराष्ट्रातील ही मजेशीर, गमतीशीर परंपरा आहे.
चला तर तुमच्यासाठी खास घेवून आलो आहोत विविध समारंभासाठी उखाणे. Marathi ukhane for female तुम्ही वाचा व तुमच्या नुकत्याच लग्न ठरलेल्या वधू वर यांना देखील पाठवा.

पैठणीवर शोभते, नाजुक मोरांची जोडी
**** रावांमुळे आली, आयुष्याला गोडी…

खडीसाखरेचा खडा खावा तेवढा गोड,
**** रावांचे नाव अमृतापेक्षा गोड…

संसाराच्या देव्हा-यात उजळतो नंदादीप समाधानाचा, **** रावांचे नाव घेऊन, मागते आशिर्वाद अखंड सौभाग्याचा.

Marathi ukhane for female

सृष्टी सौंदर्याच्या बागेला
चंद्र सुर्य झाले माळी
** चे नाव घेते,
हळदी-कुंकवाच्या वेळी

उष्णता खूप वाढली म्हून, ह्यांनी आणली कुल्फी, **** रावांसोबत काढते आज, सर्वांसमोर सेल्फी.

संसाररूपी कादंबरीचे उघडले पहिले पान
** रावांचे नाव घेते राखते सर्वांचा मान

ताजमहल बांधण्यासाठी कारागीर होते कुशल **** रावांच नाव घेते संक्रांतीकरिता स्पेशल.

घराला असाव अंगण, अंगणात डोलावी तुळस,
** रावांच्या जीवनात चढवीन
आनंदाचा कळस…

Marriage anniversary wishes for wife in marathi | बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

लग्न सोहळ्यात घ्यायची उखाणी (Marathi ukhane for female)

साता जन्मीची पुण्याई
फळाला आली आज,
***रावांच्या हाताने ल्याले मंगळसूत्राचा साज…

पदस्पर्शाने लंवडते उंबरठ्यावरलं माप, **** रावांची भाग्यलक्ष्मी म्हणुन ग्रुहप्रवेश करते आज.

नव्या नव्या संसाराचा, नाजूक-गोड अनुभवही नवा. *** राव व माझ्या संसाराला, तुमचा अखंड आशीर्वाद.

*** ची लेक झाली, *** ची सून *** च नाव घेते, गृहप्रवेश करून !

Marathi ukhane for female

तुळजाभवानीची कृपा
आणि तिरुपतीचा आशिर्वाद
माहेरचे निरंजन आणि सासरची फुलवात
*** रावांचे नाव घेवून करते
मी संसाराला सुरवात

उंबरठ्यावर माप देते
सुखी जीवनाची चाहूल
रावांच्या जीवनात टाकते
मी आज पहिले पाऊल

Maharashtrian Classy Wonderful Mundavali for Bride & Groom

वटपौर्णिमेला घ्यायची उखाणी (Marathi ukhane for female)

नऊवारी साडीवर,
शोभून दिसते ठुशी *** रावांचे नाव घेते
वटपौर्णिमेच्या दिवशी

वटपौर्णिमेच्या दिवशी,
वडाला फेरे घालते सात,
*** रावांची लाभो मला,
जन्मोजन्मी साथ…

सण सौभाग्याचा
बंध अतूट नात्याचा
*** रावांच नाव घेते
पूर्ण होवोत त्यांच्या सर्व इच्छा

Marathi ukhane for female

मराठी संस्कृतीची प्रतिमा,
सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण,
बांधून नात्याचे बंधन
रावांच्या चरणी साता जन्माचे समर्पण

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Best Anniversary wishes in marathi

मोठा उखाणा (Marathi ukhane for female)

हंड्यावर हंडे ठेवले सात,
पाण्याला जाताना शिजत घातला भात,
पाणी शेंदता शेंदता तोल गेला,
काय सांगू तुम्हाला धनीन हात दिला,
माहेरच्या आठवणीने डोळे डबडबले, खरं सांगते तुम्हाला धनीन डोळ पुसल,
सुंदर कर्तृत्ववान धनीचा मला वाटतो अभिमान
*** नी दिले मला सौभाग्यच दान

Marathi ukhane for female

नाव घ्यायला सुरवात करते, गणपतीला स्मरून,
आता माझ्या नवीन परिवाराची ओळख देते करुन
सुखी कुटुंब आमच, भरपूर सारे मामा मामी, काका काकी..
काळजी करू नको, म्हणतात आम्ही सांभाळून घेवू बाकी
उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली
अहो ना जन्म देणारी माझी दुसरी माऊली
ज्यांच्यामुळे आहेत सर्वच चेहरे हसरे,
स्वभावाला एक नंबर आमचे सासरे
संसाराच्या वाटेवर नंदाणी दिला मैत्रीचा हात, धन्यवाद त्यांचे त्यानी मला खूप दिली साथ,
लक्ष्मीच्या रूपाने उमटतील माझ्या पावलांचे ठसे..
माझी पण ओळख करून देते मी
सौ. ****** आज जमले आहेत सगळे लग्नाच्या दारात, ****** रावांच नाव घेते मला घ्या घरात…

पाऊस पडला जोरात, नदीला आला पुर, कोकिळेने पकडला मंजुळ सुर, माती झाली थंड गार, शेतकरी झाला आनंदी फार, शेतात पीकला तांदुळ, त्याचा बनविला भात, भातावर वाढले तुप, तूपा सारखे रूप रूपा सारखा जोडा, वेशित आला नवरदेवाचा घोडा, नवरदेवाच्या घोड्यावर आंथरली चंदेरी शाल, संबळाने पकडली चाल, मेहंदी ने झाले हाथ लाल, सनईचे सुर ताल, आनंदाने नाचे बाल गोपाल, आता झाली शुभ मुहूर्ताची वेळ, ब्राम्हण बोले मंगल, अंतर पाठ धरला हाथी, अक्षदा पडल्या माथी लग्न लावून दिले हातात हार, नवरदेव झाला आनंदी फार लग्न लाऊन नवरदेव हसले मला घेऊन गाडीत बसले, आई वडिलांचे डोळे भावाने पुसले माप ओलांडून मी घरात घुसले, आता गणपती पुजेसाठी बसले उखाणा घेते आज मला आली लाज, ****** रावांचे नाव घेते शुभमंगल प्रसंगी आज

काळी डीचकी कंगोऱ्याची, आंत भाजी लिंबोऱ्याची, इन मोठी ठकोऱ्याची, कुंकू लेती बारदानी, बारदानीचा आरसा, आरसा मागं परसा, परसांत होती केळं, केळीला आल्या तीन कळ्या, तीन कळ्यांची बांधली माडी, माडीवर होती तुळस, तुळशीची करतें सेवा. ***** रावांचा न् माजा जोडा जन्माला जावा..

Treading

More Posts