दत्त जयंती 2024 शुभेच्छा, कथा आणि स्टेटस | Datta Jayanti 2024 Wishes in Marathi and status
दत्तजयंती म्हणजे दत्त दिगंबर यांचा अवतार प्रकट दिन. (Datta Jayanti 2024 Wishes in Marathi and status) मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा दिवशी ही जयंती साजरी केली जाते. या वर्षी दत्तजयंती शनिवार १४ डिसेंबर रोजी आहे. दत्त मंदिरामध्ये या दिवशी अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते. पालखी सोहळा, भजन, महाप्रसाद सह अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.
मुहूर्त: मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा १४ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ४:५८ वाजता सुरू होईल. ते १५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी २:५१ वाजता संपेल. म्हणून या वर्षी दत्त जयंती १४ डिसेंबर ला साजरी होईल.
दत्त जयंती कथा:
महर्षी अत्री ऋषी आणि माता अनुसूया यांचे पुत्र भगवान दत्तात्रय आहेत. (Datta Jayanti 2024 Wishes) हे ब्रह्म विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रुप आहे. या मागची कथा अशी की एक दिवशी नारद मुनींनी माता लक्ष्मी, माता पार्वती आणि माता सरस्वती यांना आपापसात पतिव्रतेबद्दल चर्चा करताना पहिले, तेव्हा त्यांनी अत्री महामुनी ची पत्नी अनुसूया च्या असाधारण पातिव्रत्याबद्दल सांगितले. ते ऐकून तिन्ही देवीना त्याबद्दल ईर्षा व्हायला लागली तेव्हा त्यांनी अनुसूयेचे पातिव्रत्य खंडित करण्यासाठी आपल्या पतींना सांगितले.
ब्रह्म, विष्णू आणि महेश भगवान माता अनुसूया च्या पतिव्रतेची परीक्षा घेण्यास गेले तेव्हा अत्री ऋषी आश्रमात नव्हते.
त्या तिघांनी संन्यासाचे रूप घेतले व भिक्षा मागू लागले. (Datta Jayanti 2024 Wishes in marathi) अतिथी संस्कार म्हणून त्यांचं योग्य स्वागत करून माता अनुसूयेने जेवणासाठी आग्रह केला. तेव्हा तिघांनीही एका सुरात सांगितले, “आम्हाला नग्न होऊन जेवण वाढले तरच आम्ही जेवू”. त्यावर माता अनुसूया संभ्रमात पडली.
तिने आपल्या पतीचे नामस्मरण केले, तिच्या दिव्यशक्तीमुळे तिला जाण झाली की परीक्षा घेण्यास त्रिदेव आले आहेत. तिने त्यांस सांगितले, “ जशी तुमची इच्छा” आणि त्यांवर पाणी थेंबाचे शिंदोडे उडवले. आणि बघताच त्यांचे गोंडस बालकात रुपांतरण झाले. माता अनुसूया मधे सुद्धा मातृत्वाचे भाव उमडू लागले. तिने त्यांना स्तनपान दिले.आणि अश्याप्रकारे माता अनुसूया चे पातिव्रत्य अबाधित राहिले. व पुढे तिन्ही देवांना त्यांच्या देवीना सुपूर्द करुन. पुन्हा तिन्ही देवांचा तिच्या गर्भातून जन्म व्हावा हा आशीर्वाद तिने घेतला. तेव्हा पुढे दत्तात्रय अवताराचा जन्म झाला.
अश्या या शुभ दिनी भाविक दत्ताची मनोभावे पूजा करतात. आजच्या digital युगात प्रत्येकाला भेटून शुभेच्छा देणे शक्य होत नाही म्हणून तुमच्या साठी हा शुभेच्छांचा खजिना घेवून आलो आहोत.

कृते जनार्दनो, त्रेता रघुनंदनम
द्वापारे रामकृष्णच
कलो श्रीपाद श्री वल्लभा || (अर्थ – ज्याप्रमाणे कृतयुगात जनार्दन, त्रेतायुगात रघुनंदन व द्वापार युगात रामकृष्णाचा अधिकार होता तसे ह्या कलियुगातश्रीपाद श्री वल्लभ आहेत.)
दत्तगुरू म्हणावे की स्वामी
समर्थ म्हणावे की नृसिंह सरस्वती
औदुंबर की कल्पतरू
दीन दुःखीताचा कैवारू
दत्ता च्या चरणी ठेवुनी माथा,
झालो अखंड दास मी आता
त्रिमूर्तीचा अवतार तू
दत्तरूप साकार तू
घडवतोस साक्षात्कार
तुझ्या चरणी माझा नमस्कार
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

त्रिमूर्ती हा अवतार, दत्तरूपी साकार,
त्रिभुवनी पसरे भक्तीचा सागर,
होता साक्षात्कार घडतो चमत्कार,
गुरूमाऊली चरणी माझा नमस्कार
दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा
(Datta Jayanti 2024 Wishes)
दत्ता दिंगबरा या हो
सावळ्या मला भेट द्या हो,
दत्ता दिगंबरा या हो
दयाळा मला भेट द्या हो
जय गुरुदेव दत्त
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
वाणी असे मधुर
बुद्धी असे सतेज,
चित्त असे एकाग्र,
सद्गुरू दर्शन
दत्त दिगंबर..दत्त दिगंबर..

तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया
तुमच्या माझ्याभोवती औदुंबर वसले
मला हे दत्तगुरू दिसले.
दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा Datta Jayanti 2024 Wishes
दत्तात्रेय हरे कृष्णा उन्मत्तानंद दायका
दिगंबरा मुनीबाला पिशाचा ज्ञानसागरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!!
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान,हरपले मन झाले उन्मन
मी तू पणाची, झाली बोळवण
एका जनार्दनी श्री दत्त ध्यान दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
त्रिभुवनाचा स्वामी श्रीपाद श्रीवल्लभ
तीन शिरे सहा कर दत्त दिगंबर
अवघा भरला आनंद जनांत
रंगले भक्त दत्त दत्त नामात..
Read My Blog – गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश | guru purnima wishes in marathi.

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
दत्त जयंतीच्या मनःपुर्वक शुभेच्छा!!!
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा
नेती नेती शब्द न ये अनुमाना
सुरवर मुनीजन योगी समाधी न ये ध्याना….
नाथांच्या नाथा…
सिद्ध समर्थ शुभंकरा…
नमितो तुज देवा…
शरण आलो कृपा करा दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
Read My Blog – वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy birthday wishes in marathi
Read My Blog – Christmas Wishes in marathi 2024 | नाताळच्या मराठीतून शुभेच्छ्या
Read My Blog – वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy birthday wishes in marathi