Navratri 2025 colors and their significance | नवरात्रीच्या नऊ दिवसांचे ९ रंग, जाणून घ्या महत्व
हिंदू संस्कृतीत नवरात्रोत्सवाला खूप महत्त्व आहे. (Navratri 2025 colors) दैवी स्त्री शक्तीचा उत्सव साजरा करणारा हा चैतन्यमय आणि पवित्र सण म्हणजे देवी दुर्गा आणि तिच्या विविध रूपांची पूजा करणे. हा सण अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा (पहिल्या दिवशी) सुरू होतो आणि नवमी (नवव्या दिवस) पर्यंत साजरा केला जातो. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. प्रत्येक दिवशीचा एक विशिष्ट रंग असतो आणि भाविक त्या रंगाचे वस्त्र परिधान करतात. असे मानले जाते की नवरात्री रंग धारण केल्याने सकारात्मकता, उर्जा आणि मातादेवीचे आशीर्वाद लाभतात.
नवरात्री २०२५ कधी आहे?
या वर्षी नवरात्री २२ सप्टेंबर २०२५ (सोमवार) पासून सुरु होईल आणि समाप्ती ३० सप्टेंबर २०२५ (मंगळवार) रोजी होईल.
नवरात्रीत रंग का पाळले जातात?
नवरात्रीतला प्रत्येक रंग हा देवीच्या विविध रूपांशी जोडलेला आहे. तो रंग त्यादिवशी परिधान करणे म्हणजे त्या दिवसाच्या दुर्गा रूपाशी एकरूप होणे व त्या ऊर्जेची भक्ती करणे होय.

Navratri 2025 colors day 1 – नवरात्री पहिला दिवस – पांढरा (White) (२२ सप्टेंबर २०२५, सोमवार)
पांढरा रंग हा शुद्धतेचं आणि शांततेचं प्रतीक आहे. या दिवशी पांढऱ्या रंगाचं वस्त्र धारण केल्याने मन प्रसन्न राहते आणि सकारात्मक ऊर्जा देखिल लाभते.
Navratri 2025 colors day 2 – नवरात्री दुसरा दिवस – लाल (Red) (२३ सप्टेंबर २०२५, मंगळवार)
लाल रंग हा माता दुर्गेच सामर्थ्य दर्शवणारा रंग आहे. लाल रंग हा शक्ती, प्रेम व ऊर्जेच प्रतीक आहे.
Navratri 2025 colors day 3-नवरात्री तिसरा दिवस – रॉयल ब्लू (Royal Blue) (२४ सप्टेंबर २०२५, बुधवार)
रॉयल ब्लू म्हणजेच निळा रंग हा आत्मविश्वास दर्शविणारा रंग आहे. हा रंग स्थैर्य, भक्ती आणि धैर्य दर्शवतो
Navratri 2025 colors day 4 – नवरात्री चौथा दिवस – पिवळा (Yellow) (२५ सप्टेंबर २०२५, गुरुवार)
पिवळा रंग आनंद, प्रकाश आणि उत्साहाच प्रतीक आहे. ह्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घातल्याने उत्साह दुप्पट होतो.
Navratri 2025 colors day 5 – नवरात्री पाचवा दिवस – हिरवा (Green) (२६ सप्टेंबर २०२५, शुक्रवार)
हिरवा रंग म्हणजे निसर्ग, भरभराट, आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हर रंग धारण केल्याने आयुष्यात शांतता, नवीन संधी आणि प्रगती मिळते.
Navratri 2025 colors day 6 – नवरात्री सहावा दिवस – करडा(Grey) (२७ सप्टेंबर २०२५, शनिवार)
करडा रंग हा संयम, संतुलन आणि स्थैर्याच प्रतीक आहे. हा रंग कात्यायनी ला समर्पित आहे. करडा रंग परिधान केल्याने मनास स्थिरता लाभते. मन नकारात्मक ऊर्जेपासून दूर रहाते व आत्मविश्वास वाढतो.
Navratri 2025 colors day 7 – नवरात्री सातवा दिवस – नारिंगी (Orange)(२८ सप्टेंबर २०२५, रविवार)
नारंगी रंग हा उत्साह, ऊर्जा आणि प्रेरणा यांचं प्रतिक आहे. हा रंग कालरात्रीला समर्पित आहे. हा रंग धारण केल्याने संकटावर मात करण्याचे सामर्थ्य व शक्ती मिळते.
Navratri 2025 colors day 8 – नवरात्री आठवा दिवस – मोरपिशी ( Peacock Green) (२९ सप्टेंबर २०२५, सोमवार)
मोरपिशी रंग हा सौंदर्य, अद्वितीयता आणि सर्जनशीलता यांचं प्रतीक आहे. हा रंग महागौरीला अर्पित आहे. हा रंग धारण केल्याने मानसिक शांति, शुद्धता आणि अध्यात्मिक उन्नती मिळते.
Navratri 2025 colors day 9 – नवरात्री नववा दिवस – गुलाबी (Pink) (३० सप्टेंबर २०२५, मंगळवार)
गुलाबी रंग हा प्रेम, करुणा, सहानुभूती आणि सौम्यतेचं प्रतीक आहे. हा रंग धारण केल्याने भक्तिभाव, सकारात्मकता आणि मनःशांती मिळते.
Click here to watch नवरात्री non stop गरबा/ दांडिया songs
Visit my blog – वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy birthday wishes in marathi
Buy Mirror Bow clip for this Navratri & Other cool accessories.






