आपल्या मराठी संस्कृती मधे विविध समारंभात पत्नी किंवा पती ला नाव (Marathi ukhane for female) घेण्यास लावले जाते. त्यालाच उखाणा घेणे असे देखील म्हटले जाते. खासकरून नववधू व वर यांस आग्रहाने नातेवाईकांकडून उखाणा घेण्यास सांगितले जाते. उखाणे घेण्याची महाराष्ट्रातील ही मजेशीर, गमतीशीर परंपरा आहे. चला तर तुमच्यासाठी खास घेवून आलो आहोत विविध समारंभासाठी उखाणे. Marathi ukhane for female तुम्ही वाचा व तुमच्या नुकत्याच लग्न ठरलेल्या वधू वर यांना देखील पाठवा.
हंड्यावर हंडे ठेवले सात, पाण्याला जाताना शिजत घातला भात, पाणी शेंदता शेंदता तोल गेला, काय सांगू तुम्हाला धनीन हात दिला, माहेरच्या आठवणीने डोळे डबडबले, खरं सांगते तुम्हाला धनीन डोळ पुसल, सुंदर कर्तृत्ववान धनीचा मला वाटतो अभिमान *** नी दिले मला सौभाग्यच दान
नाव घ्यायला सुरवात करते, गणपतीला स्मरून, आता माझ्या नवीन परिवाराची ओळख देते करुन सुखी कुटुंब आमच, भरपूर सारे मामा मामी, काका काकी.. काळजी करू नको, म्हणतात आम्ही सांभाळून घेवू बाकी उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली अहो ना जन्म देणारी माझी दुसरी माऊली ज्यांच्यामुळे आहेत सर्वच चेहरे हसरे, स्वभावाला एक नंबर आमचे सासरे संसाराच्या वाटेवर नंदाणी दिला मैत्रीचा हात, धन्यवाद त्यांचे त्यानी मला खूप दिली साथ, लक्ष्मीच्या रूपाने उमटतील माझ्या पावलांचे ठसे.. माझी पण ओळख करून देते मी सौ. ****** आज जमले आहेत सगळे लग्नाच्या दारात, ****** रावांच नाव घेते मला घ्या घरात…
पाऊस पडला जोरात, नदीला आला पुर, कोकिळेने पकडला मंजुळ सुर, माती झाली थंड गार, शेतकरी झाला आनंदी फार, शेतात पीकला तांदुळ, त्याचा बनविला भात, भातावर वाढले तुप, तूपा सारखे रूप रूपा सारखा जोडा, वेशित आला नवरदेवाचा घोडा, नवरदेवाच्या घोड्यावर आंथरली चंदेरी शाल, संबळाने पकडली चाल, मेहंदी ने झाले हाथ लाल, सनईचे सुर ताल, आनंदाने नाचे बाल गोपाल, आता झाली शुभ मुहूर्ताची वेळ, ब्राम्हण बोले मंगल, अंतर पाठ धरला हाथी, अक्षदा पडल्या माथी लग्न लावून दिले हातात हार, नवरदेव झाला आनंदी फार लग्न लाऊन नवरदेव हसले मला घेऊन गाडीत बसले, आई वडिलांचे डोळे भावाने पुसले माप ओलांडून मी घरात घुसले, आता गणपती पुजेसाठी बसले उखाणा घेते आज मला आली लाज, ****** रावांचे नाव घेते शुभमंगल प्रसंगी आज
काळी डीचकी कंगोऱ्याची, आंत भाजी लिंबोऱ्याची, इन मोठी ठकोऱ्याची, कुंकू लेती बारदानी, बारदानीचा आरसा, आरसा मागं परसा, परसांत होती केळं, केळीला आल्या तीन कळ्या, तीन कळ्यांची बांधली माडी, माडीवर होती तुळस, तुळशीची करतें सेवा. ***** रावांचा न् माजा जोडा जन्माला जावा..